मी अजुन वेडा होतो ,
ते स्वर तिचे स्मरताना,
रात्रिस मजला बिलगती,
त्या धुंद आर्जवी ताना.
आकंठ रसाने भिजतो,
न उरे कोरडी जागा ,
मधुनाद तिच्या कंठीचा,
मम हृदयी आहे जागा ।
जरी गीत अधूरे राहिले ,
मज दू:ख नसे त्याचे ,
मज पुरेल आयुष्याला ,
ते बोल तिचे मुखड्याचे।
- शशांक प्रतापवार
Wednesday, September 2, 2009
Subscribe to:
Posts (Atom)